About Organization
श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ
श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ (नोंदणीकृत सार्वजनिक न्यास), गोजुबावी, ता. बारामती, जि. पुणे ही संस्था समाजातील उपेक्षित, मतिमंद, दिव्यांग मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी कटिबद्ध आहे.
आज बारामती तालुक्यात सुमारे १५० प्रौढ मतिमंद व्यक्ती असून इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यांमध्ये ३६० पेक्षा जास्त मतिमंद मुलं व व्यक्ती आहेत. वय १८ वर्षांनंतर या विशेष मुलांना आधार देणाऱ्या आणि सन्मानाने जगण्याचे कौशल्य शिकवणाऱ्या निवासी पुनर्वसन केंद्रांची मोठी कमतरता आहे.
आमचे केंद्र केवळ निवारा नव्हे, तर शेती श्रमसंस्कार, निसर्गोपचार, कला व व्यावसायिक कौशल्यांच्या माध्यमातून या मुलांना स्वावलंबी बनवणारी कर्मभूमी आहे.
View Trust Registration & 80G Documents